शुक्रवार, ११ सप्टेंबर, २००९

काय शिकवतात तरी काय ?

पहिला दिवस तर खुप मस्त होता. ताईंनी कागदाचे कपटे करुन छान पाऊस पाडला. तो दिवस अजुन डोळ्यासमोरून जात नाही. मग पालक सभा झाली, आणि एके दिवशी ताईंनी चक्क पालकांनाच त्या सर्व गोष्टी करायला लावल्या ज्या मुल रोज करतात.

आज 'पालकभेटीत' जाणवल की वेळ बराच गेलाय; मुल बरच शिकलीत कातरकाम, मुक्तचित्र, मातीकाम, मणिकाम, चिकटकाम, सुलेखन ... संपतच नाही.

आपण या वर्षी शिकणार भाषा, गणित आणि विज्ञान. बाकी वाचायला शिकणार, पण लिहायला नाही. लिहिण्यासाठीची तयारी मात्र सुरु झालीय, म्हणजे बोट, हात आणि मेंदुना एकत्र काम करायची सवय लावली जाणारय.

या सत्रात तीन 'विषय' शिकणार, अर्थात जे शिकायच ते भाषा, गणित आणि विज्ञानाची जाणिव विकसीत करत.

1. प्राणी आणि पक्षी

2. पाणी
3. फळ आणी फुल

आणि हे शिकताना, पाच 'स्व' लक्ष्यात ठेवणार आहोत.

1. स्वयंस्फुर्ती
2. स्वातंत्त्र्य
3. स्वयंशीस्त
4. स्वावलंबन
5. स्वयंशिक्षण